Friday, September 23, 2022

छापा छापी

              पी एफ आय वर जी इतक्या मोठ्या प्रमाणात छापेमारी झाली ती भारतीय यंत्रणांच्या इतिहासात तरी अद्वितीय अशी आहे. यापूर्वी सिमी वर कारवाई झाली होती. परंतु एकत्रितपणे छापे मारून अटकसत्र राबविण्याची ही पहिलीच वेळ. आजकाल ई डी चे छापे हे रोजचेच झाले आहे. ते राजकीय हेतूने मारले जातात असा आरोप होतो. असेल ही. परंतु पी एफ आय वरच्या छाप्यांचे वैशिष्ट्य  असं की छापे मारलेल्या राज्यांपैकी अर्ध्याच्या वर हे बिगर भाजप शासित आहेत. इतक्या राज्यांच्या पोलिसांनी केंद्रीय सुरक्षा यंत्रणांना सहकार्य केलं आणि हे प्रकरण गुपित ठेवलं हे काही राज्य सरकारच्या किंवा किमान मुख्यमंत्र्यांच्या अणि गृहमंत्र्यांच्या संमतीशिवाय शक्य नाही. विशेष म्हणजे या यादीमध्ये केरळचा ही समावेश आहे! 

             यावरून काही गोष्टी प्रकर्षाने समोर येतात . एक म्हणजे - देशाच्या सुरक्षेचा प्रश्न राजकीय पक्ष गांभीर्याने घेतात आणि पक्षीय राजकरण करीत नाहीत ही अत्यंत आनंदाची बाब आहे.  आपल्या राजकीय विरोधकांना देशद्रोही म्हणणे हा  प्रचार तंत्राचा एक भाग असतो. परंतु हल्ली नेते आणि बरेच सामान्य लोक ती गोष्ट सिरीयसली घेत होते. खरेच राजकीय विरोधक हे देशद्रोही आहेत असे चित्र निर्माण झाले होते. किमान या छापसत्राने तो गैरसमज दूर व्हावा ही अपेक्षा. वेगळी विचारधारा म्हणून आपल्याच लोकांना दूर करण्याची चूक होऊ नये. 

           दुसरे म्हणजे या प्रकरणाने इस्लामी मूलतत्त्ववाद हा किती गांभीर्याने घेणे जरुरीचे आहे हे ही समोर येते. यांच्याकडे करोडो रुपयांच्या देणग्या आल्याचे पुरावे आहेत. विदेशातून पण खूप रक्कम आली आहे. म्हणजे अर्थातच हे चार सोम्या गोम्यांचे काम नाही.यामागे बरीच मोठी यंत्रणा आहे अणि अनेक लोक अणि संघटना यात सुप्तपणे सहभागी आहेत. किमान 5-6 मध्यपूर्वेतील रहिवासी यांच्या संपर्कात होते अणि रसद पुरवत होते असे समोर आले आहे. आणखी बरेच असतील. आपल्याकडे संघ आणि मोदींना विरोध करण्याच्या नादात या देशविघातक शक्तिंचे इरादे अणि योजना किती मजबूत आहेत या गोष्टींकडे डोळझाक केली जते. संघाची अणि तालिबानची तुलना केली जाते. तुम्हाला संघाच्या विचारसरणी बद्दल आक्षेप असू शकतो, भाजपच्या राजकारणाबद्दल आक्षेप असू शकतो. परंतु ढोबळ स्वरूपात( कारण सूक्ष्म स्तरावर विरोधाभास असू शकतो - Operationally) ते देशाचे अहित चींतणार नाहीत याची खात्री विरोधकांनाही आहे. म्हणूनच तर देशात अनेक सरकारे बदलली तरीही संघ टिकून आहे अणि अधिक बलवान होत आहे. हीच गोष्ट पी एफ आय सारख्या संघटनेबद्दल म्हणता येईल का? देशाच्या वाइटावर बसलेले हे अणि त्यांचे परकीय म्होरके हे भारत केंव्हा गिळंकृत करतील कळणार पण नाही अणि आपण राजकारण करत बसू. तुम्ही भाजपचा राजकीय विरोध जरूर करा. परंतु ते देशविघातक आहेत असा समज करून घेऊ नका. आपल्याच लोकांना दूर करण्याची चूक होऊ नये. 

            तिसरी म्हणजे या प्रकरणाने इस्लामबद्दल अणि भारतीय मुसुलमनांबद्दल अजून विद्वेष पसरवला जाऊ शकतो. भारतातील प्रत्येक मुसुलमन हा देशद्रोही आहे किंवा अशा दहशतवाद्यांना समर्थन करतो हा समाज चुकीचा आहे.या देशात मुसलमान व्यापारी म्हणून आले,काही जण आक्रमणकरते म्हणूनही सुद्धा आले, त्यांच्या सोबतचा लावजमा आला. पुढे काही जण इथेच स्थायिक झाले आणि शासक झाले, काहींचे पूर्वज धर्मांतरित होऊन इस्लामी झाले. परंतु सगळे इथे थांबले कारण त्यांना या भुमिबद्दल प्रेम आणि आकर्षण होते.  खरं तर आजच्या पिढीतील बहुसंख्य भारतीय मुसुलमान हे या देशात रहात असल्याबद्दल समाधानी आहेत. काहींमध्ये थोडी चलबिचल आहे विविध कारणांमुळे . अणि नेमक्या याच परिस्थितीचा फायदा पी एफ आय सारख्या संघटना घेतात. देशातील काही घटनांचा संदर्भ देऊन अशा चंचल प्रवृत्तींना आपल्याकडे खेचून त्यांचा दुरुपयोग करून देशात हाहाकार मजवणे हा यांचा हेतू. आणि अत्यंत कर्मठ इस्लामी शासन आणणे हा त्यांचा उद्देश. त्यांना सामान्य मुसुलमनांच्या भावनांशी अणि त्यांच्यावर झालेल्या कथित अन्यायाबद्दल काहीही घेणे देणे नसते. तरी काहींच्या गैरकृत्यमुळे सर्व मुसुलमनांना देशद्रोही किंवा त्यांचे समर्थक समजू नये. आपल्याच लोकांना दूर करण्याची चूक होऊ नये. 

चौथी गोष्ट. आपल्याच धर्माबद्दल असे का होते? बरं इथेच नाही तर अनेक देशांत काही प्रमाणात इस्लाम बद्दल द्वेष आहे. किमान अविश्वास तरी आहेच. असे का? हा विचार मुस्लिम नेत्यांनी आणि जाणकार मंडळींनी जरूर करावा. आपण इथले राज्यकर्ते होतो अणि आता दुय्यम नागरिक बनू या भीतीने पाकिस्तानची निर्मिती झाली. काय अवस्था झाली आहे पहातोच आहे. त्या मानाने इथेच थांबलेले मुसलमान बरेच सुस्थितीत आहेत. त्यामुळे भारतात हिंदू राज्य येईल अणि आपल्यावर अनन्वित अत्याचार होतील या भ्रमात राहू नये. या देशात हिंदूंचे राज्य असताना गेले कित्येक शतके  कोणावरही असे झाले नाही. होणार नाही. अणि देशातले हिंदू तुमचे बांधव आहेत. तुम्हाला कदाचित कळत असेल किंवा नसेलही परंतु पाकिस्तानातील मुसलमानाच्या तुलनेत हे हिंदू तुम्हाला जास्त जवळचे आहेत. आपल्याच लोकांना दूर करण्याची चूक मुसलमानांनी करू नये.

            पी एफ आय , इसिस सारख्या शक्तींना पराजित करायचे असेल तर आपल्याला अविश्वास सोडून सर्वेलांस अणि काउंटर इंटेलिजन्स सारख्या गोष्टींकडे वळायला हवे. धर्माचे राजकरण हे ऐकायला कितीही रमणीय वाटले तरी ते देशाला घटक ठरणार यात शंका नाही. आता, जर कोणाला वाटत असेल की मी उगाच सेक्युलर फंडा मरतोय किंवा सुप्त पणे हिंदू अजेंडा पुढे सरकवत आहे तर हे लक्षात घ्या - योगायोगाने ( अणि खरेच योगायोगाने असेल) ज्या वेळी हे छापे मारले जात होते नेमक्या त्याच वेळी सरसंघचालक हे दिल्लीतील मशिदीचा दौरा करीत होते. आणि मौलवींनी त्यांचे स्वागत केले . त्यांची स्तुतीही केली. एक वेळ आमचे  सोडा- ते दोघे तर निश्चित मूर्ख नसतील ना?


सुशांत गोसावी

23 सप्टेंबर २०२२

No comments:

Post a Comment