Saturday, September 9, 2017

खोले आणि इतर काही

कॉलेजात असताना अनेक मित्र मला नॉन-व्हेज खातो का? विचारायचे. अर्थात बहुतांश प्रश्न सरळ असायचे - खातोस का ? घरी कोणी खातात का ? वगैरे. काही प्रश्नांचे 'अंडर टोन्स' 'वेगळे' असल्याचे जाणवायचे मला .परंतु नसत्या भानगडीत '' पडण्याची सवय (आणि वडिलांचा सल्ला) यामुळे मी 'आलेल्या प्रश्नांची' अगदी त्रोटक शब्दात उत्तर देऊन मोकळा होत. बऱ्याचदा माझी 'जात' कळल्यावर हा प्रश्न विचारला जाई किंवा मेस च्या रांगेत माझ्या ताटातले पदार्थ पाहून जातीचा खातरजमा केला जाई .म्हणजेच एक माणूस म्हणून माझ्याबद्दल काहीही माहिती नसतांना माझ्या सवंगड्यांनी (आणि समाजाने) माझ्याबद्दल -माझ्या घरच्यांबद्दल ,खाण्या-पिण्याच्या सवयींबद्दल अंदाज बांधून ठेवले होते. प्रश्न हे केवळ मी 'साच्यातला' आहे कि बाहेरचा इतकेच जाणून घेण्याकरिता!.एका विशिष्ट जातीने किंवा समाजाने काय करावे अथवा करू नये हा साचा आधीच ठरलेला होता. खूप आधी पासून -माझ्या जन्माच्या हजारो वर्षांपूर्वी पासून'. आणि विशेष म्हणजे स्वातंत्र्यानंतर पन्नास वर्षांनंतर ( त्यावेळी) सुद्धा लोक साचाच शोधत होते. हे सगळं माझ्या बाबतीतच होत होतं असं नाही. इतरही होते. विविध 'जातीतले'.
बरं -खातो कि नाही ? इथपर्यंत ठीक. का नाही खात- हा भोचक प्रश्न कशाला? मी कधीही कोणाला 'का खातोस' हा प्रश्न विचारला नाही. एकदाचा प्रसंग आठवतो. शेवटच्या वर्षात असतांना एका मित्राच्या जॉब पार्टीसाठी (कॅम्पस ) हॉटेलात गेलो होतो जेवायला. आमच्या एका जवळच्या मित्राने प्रश्न विचारला –
"गोश्या (टोपण नाव ), चिकन नाही खात ?".
मी -"नाही "
मित्र -"का रे ? बामण आहे म्हणून ?"
मी  गप्प
दुसरा एक मित्र " अरे पण तो जोश्या खातोच कि.तो पण बामणच हाय ना "
पहिला मित्र " अरे बामणांच्यात पण लै लफडे असतात.गोश्या खाऊन बघ कि.  "
 वास्तविक हा जवळचा मित्र-म्हणजे ज्याला माझ्याबद्दल,घरच्यांबद्दल इत्यादी चांगलीच कल्पना होती. त्याने पुन्हा हा प्रश्न विचारावा ? मी जरा चिडलोच
"तू कधी साप खाल्ला आहेस का? किंवा सरडा "- मी
अगदी विचीत्र चेहेरा करून मित्र म्हणाला "याक ! काहीही काय बोलतोस ? जेवणाची वाट नको लावू राव !"
अर! पण छान लागतो साप -चिनी लोक आवडीने खातात मी
"चिनी लोक काहीही खातात -आपण नाही त्यातले मित्र
"बरं -तू ज्या दिवशी साप खाशील त्या दिवशी मी पण तू म्हणशील ते खाईन म्हणून मी विषय संपवला.
पुढे आयुष्यात हजारोवेळा माझ्या खाण्याच्या सवयीबद्दल विचारणा होत ( रिमेम्बर -साचा !). परंतु कॉलेजातील त्या प्रसंगानंतर 'साप' माझ्या डिफेन्स ला धावून येत ! अर्थात या  उदाहरणावरून मी हे अधोरेखित करीत कि खाण्या -पिण्याच्या आणि इतर सवयी या समाजाने आपल्याला दिलेला वारसा आहे. आपण ज्या वातावरणात वाढलो त्याचा प्रभाव असणारच ना ? मग तो योग्य असो कि अयोग्य. काय खावे आणि काय नाही - ज्याचा त्याचा प्रश्न.जोपर्यंत तुम्ही खाऊन किंवा ना-खाऊन कायदा नाही मोडत तो पर्यंत काहीही करायला तुम्ही स्वतंत्र आहात -अगदी कायद्यात बसत असेल तर गोमांस सुद्धा. याचा जातीशी काय संबंध ? परंतु आजही आपण समाजात 'साचा' वापरतोच.

गेले काही दिवस 'खोले' प्रकरण जाम पेटलंय. वास्तविक खोले बाई वेधशाळेच्या प्रमुख असतांना त्यांची टिंगल करायला मला जाम आवडायचं.म्हणजे बघा ना -हमखास अंदाज चुकायचे ! अतिवृष्टीचा अंदाज असेल तर ढग फिरकायचे सुद्धा नाहीत ! परंतु आता त्या प्रकाशझोतात आल्यात वेगळ्याच प्रकरणामुळे. त्यांनी केले ते बरोबर कि चुकीचे -कि स्वयंपाकी बाईंची बाजु योग्य -तक्रार मुळात कायद्याला धरून आहे कि नाही ? याचा शहनिशा पोलिस ,वकील ,न्यायालय करेलच. परंतु नेहेमीप्रमाणे माध्यमांनी आणि सोशल-मीडिया वरील रिकामड्यांनी आधीच निवाडा लावलाय. खोले बाई दोषी. इथपर्यंत तरी मी म्हणतो ठीक. आता त्या पुढे जाऊन एका विशिष्ट समाजाच्या चाल-रीतींबद्दल आणि एकंदरीत त्या समाजाबद्दल अत्यंत आक्षेपहार्य असे लिहिले जात आहे. स्वतःला 'प्रोग्रेसिव्ह' समजणारे किंवा तसा 'आव' आणणारे या चाल-रीती कशा खुळचट आहेत हे दाखवून देण्याच्या चढाओढीत आहेत. एका 'वैद्याने' तर म्हणे या समाजाच्या  **** वर ( मी तो शब्द इथे वापरणार नाही) चाबकाचे फटके मारावे असे म्हटले आहे. या सगळ्या नव - आगरकर,शाहू,फुले, सत्यशोधकांना माझे इतकेच म्हणणे आहे - दादा तुम्ही लै भारी . तुमचं सगळं सगळं बरोबर. पण चालीरीती काय एकच समाज पाळतो का ? का दिसलं मऊ म्हणून खाणा कोपऱ्याने ? एक प्रकरण घेऊन त्या समाजाला अक्कल शिकवण्यापूर्वी आपल्या खाली काय दडलंय ते तर पहा ! तुम्ही  साप केंव्हा खाणार ते सांगा! बाकी गावगप्पा नंतर मारू!!

जाता जाता - कोणत्याही व्यक्तीचा मृत्यू होणे वाईट. हत्या होणे त्याहुन वाईट. हत्येचा निषेध करावाच. परंतु या लंकेश बाईने असे काय दिवे लावलेत कोणास ठाऊक. तिचे साहित्य ( म्हणजे असे काही असेल तर ) वाचले नाही. पण काही निवडक सोशल मीडिया वरील पोस्ट्स वाचनात आल्या. त्यावरून लायकी ओळखली.दोन बाटल्या देशी बेवडा मारून एखादा झोपडीदादा जशी भाषा वापरेल तशी हिची भाषा. बाकी काय दिवे लावलेत ती जाणो आणि तिची मेणबत्ती गॅंग !


सुशांत गोसावी