Sunday, September 25, 2022

खेळ मांडिला

           राजस्थानातील गेहेलोत समर्थक 85-90 आमदारांनी एकत्रितपणे राजीनामा दिला हे काही स्वतः गेहेलोत यांची संमती आणि आशीर्वाद असल्याखेरीज शक्य नाही. अर्थात गेहेलोत यांनीच हे सगळे घडवून आणले आहे यात काडीमात्र शंका नाही. सचिन पायलट यांना मुख्यमंत्री बनाण्यापासून रोखण्यासाठी असे केले असले तरी त्याच्या मागे इतरही कारणे आणि गणितं आहेत. 2013 मध्ये मंत्रिमंडळाने पारित केलेला प्रस्ताव राहुल गांधींनी भर पत्रकार परिषदेत फाडला होता. यावेळीही एक व्यक्ती एक पद या मुद्द्यावर जाहीररीत्या मतप्रदर्शन करून त्यांनी गेहेलोत यांना एक प्रकारे जागा दाखवून दिली होती. हा संदेश जाहीररीत्या न देता खासगीतून पण देता आला असता. परंतु गांधी या आडनावातच हा झोल दिसतोय. स्वतः ला पडलालासा नसल्याची दाखवायची .परंतु सूत्र मात्र हाती ठेवायची. दैनंदिन कामकाजातून स्वतः नामनिराळे होऊन पण स्वतःची लार्जर देन लाईफ प्रतिमा निर्माण करायची आणि जपायची. आता राहुल हे काँग्रेस चे 52 पैकी एक खासदार. त्यांना नको त्या गोष्टीत ढवळाढवळ करायची गरज होती का? किंवा निदान तसे सार्वजनिकरित्या दाखवण्याची गरज होती का? पण वर म्हटल्याप्रमाणे गांधी किडे नडतात. आता कशी सणसणीत थोबाडात बसली? सोडावं म्हणावं हा गुंता . आता बिळात जाणार! 

          गेहेलोत यांची ही एक प्रकारे गांधी कुटुंबीयांना चपराक आहे. मनमोहन सिंग आज खूप आनंदित असतील नक्कीच. याचे परिणाम दुरगामी आहेत. असं गृहीत धरलं की यात गांधी कुटुंबीयांचा काही हात नाही( त्या बाबत खाली लिहिले आहे) तर, काँग्रेस अध्यक्ष निवडणुकीत सर्वात प्रबळ उमेदवार असून सुद्धा हे सगळे होऊन ही जर गेहेलोत यांना उमेदवार केले आणि गांधी कुटुंबीयांनी पाठिंबा दिला तर ते दुबळे दिसणार. राजकारणात ऑप्टिक महत्त्वाचे असते. फायदा गेहेलोत यांना होणार. गेहेलोत यांचे पारडे पहिल्यापासूनच जड असेल. अणि पुढे मागे ते कुरघोडी करणार हे नक्की. बरं एवढा देखावा करून  निवडून आणलेल्या अध्यक्षाला असंच तर नाही ना काढू शकत? सीताराम केसरीना काढले तो काळ वेगळा होता. हे 1998 नाही अणि गेहेलोत काही केसरी नाहीत. म्हणजे मग गांधींना पुढील काही वर्षे तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करावा लागेल. बरं जर गेहेलोत यांच्या उमेदवारीला पाठिंबा नाही दिला तर ते तर मुख्यमंत्री पदी कायम राहतील. परंतु काँग्रेस ला नवीन अध्यक्ष हुडकावा लागेल. म्हणजे बेइज्जती त्यात पण आलीच! थोडक्यात चित मै जिता पट तू हारा अशातला प्रकार आहे. अणि या प्रकरणाद्वारे गेहेलोत यांनी एका राज्याचे मुख्यमंत्रीपद हे काँग्रेस अध्यक्षपदापेक्षा महत्त्वाचे हेच दाखवून दिले आहे. ती बेअब्रू वेगळीच! 

            आता या सगळ्यात आणखी एक शक्यता अशी की ही मॅच फिक्सिंग असू शकते. पायलट यांना मुख्यमंत्रिपदावरून दूर ठेवण्याकरिता गेहेलोत अणि गांधींनी योजनाबद्धरित्या हे सर्व घडवून आणले आहे.  तसे असेल तर येत्या दिवसात कळेलच. गेहेलोत यांच्या उमेदवारीला गांधी किती प्रोत्साहन देतात यावरून अंदाज येईल की त्यांची बंडाळी ही स्वनिर्मित होती की गांधी संचालित. परंतु तसे जरी असले तरीही गेहेलोत फारच शहाणे निघाले म्हणायचे! पक्ष नेतृत्वाला सोबत घेऊन स्वतःला हवे तसे करवून घेतले! त्या अनुषंगाने पण गेहलोत हे गांधींना डोईजड होतीलच आज ना उद्या. शिवाय तसे असेल तर पायलट यांचा बंडाळी करण्याचा मार्ग मोकळा. परंतु लगेच तसे करायला किंवा करवून आणायला भाजप काही मूर्ख नाही. एका वर्षाने राजस्थानात निवडणुका आहेत. तिथला इतिहास पाहता कुठलाही पक्ष दुसऱ्यांदा निवडून येत नाही. म्हणजे भाजपला निश्चित चान्स आहे या वेळी. मग ते पायलट यांना का घेतील?किंबहुना घेऊन काही फायदा नाही. त्यांच्या समर्थकांना तिकीट द्यावे लागेल ते वेगळेच. त्या पेक्षा ते पायलट यांना काँग्रेस मध्येच राहण्याचे सल्ले देऊन आतून पोखरून काढायला लावतील.  पुढे वसुंधरा राजेंना काटशह म्हणून मग पायलट यांना आणतील!गेहेलोत यांचे खेळून झाले. आता पायलट कसे उत्तर देतात ते बघायचे. 

असो..मला ही नेहमी विचारते तुला राजकारण इतकं का आवडते. तर त्याचे उत्तर असे की - यहाँ पे क्या नही हैं? ॲक्शन हैं, ड्रामा हैं , सस्पेन्स हैं , रोमान्स हैं  और तो और शतरंज भी तो हैं ! और क्या मंगता ?  

सुशांत गोसावी

२५- सप्टेंबर 2022

Friday, September 23, 2022

छापा छापी

              पी एफ आय वर जी इतक्या मोठ्या प्रमाणात छापेमारी झाली ती भारतीय यंत्रणांच्या इतिहासात तरी अद्वितीय अशी आहे. यापूर्वी सिमी वर कारवाई झाली होती. परंतु एकत्रितपणे छापे मारून अटकसत्र राबविण्याची ही पहिलीच वेळ. आजकाल ई डी चे छापे हे रोजचेच झाले आहे. ते राजकीय हेतूने मारले जातात असा आरोप होतो. असेल ही. परंतु पी एफ आय वरच्या छाप्यांचे वैशिष्ट्य  असं की छापे मारलेल्या राज्यांपैकी अर्ध्याच्या वर हे बिगर भाजप शासित आहेत. इतक्या राज्यांच्या पोलिसांनी केंद्रीय सुरक्षा यंत्रणांना सहकार्य केलं आणि हे प्रकरण गुपित ठेवलं हे काही राज्य सरकारच्या किंवा किमान मुख्यमंत्र्यांच्या अणि गृहमंत्र्यांच्या संमतीशिवाय शक्य नाही. विशेष म्हणजे या यादीमध्ये केरळचा ही समावेश आहे! 

             यावरून काही गोष्टी प्रकर्षाने समोर येतात . एक म्हणजे - देशाच्या सुरक्षेचा प्रश्न राजकीय पक्ष गांभीर्याने घेतात आणि पक्षीय राजकरण करीत नाहीत ही अत्यंत आनंदाची बाब आहे.  आपल्या राजकीय विरोधकांना देशद्रोही म्हणणे हा  प्रचार तंत्राचा एक भाग असतो. परंतु हल्ली नेते आणि बरेच सामान्य लोक ती गोष्ट सिरीयसली घेत होते. खरेच राजकीय विरोधक हे देशद्रोही आहेत असे चित्र निर्माण झाले होते. किमान या छापसत्राने तो गैरसमज दूर व्हावा ही अपेक्षा. वेगळी विचारधारा म्हणून आपल्याच लोकांना दूर करण्याची चूक होऊ नये. 

           दुसरे म्हणजे या प्रकरणाने इस्लामी मूलतत्त्ववाद हा किती गांभीर्याने घेणे जरुरीचे आहे हे ही समोर येते. यांच्याकडे करोडो रुपयांच्या देणग्या आल्याचे पुरावे आहेत. विदेशातून पण खूप रक्कम आली आहे. म्हणजे अर्थातच हे चार सोम्या गोम्यांचे काम नाही.यामागे बरीच मोठी यंत्रणा आहे अणि अनेक लोक अणि संघटना यात सुप्तपणे सहभागी आहेत. किमान 5-6 मध्यपूर्वेतील रहिवासी यांच्या संपर्कात होते अणि रसद पुरवत होते असे समोर आले आहे. आणखी बरेच असतील. आपल्याकडे संघ आणि मोदींना विरोध करण्याच्या नादात या देशविघातक शक्तिंचे इरादे अणि योजना किती मजबूत आहेत या गोष्टींकडे डोळझाक केली जते. संघाची अणि तालिबानची तुलना केली जाते. तुम्हाला संघाच्या विचारसरणी बद्दल आक्षेप असू शकतो, भाजपच्या राजकारणाबद्दल आक्षेप असू शकतो. परंतु ढोबळ स्वरूपात( कारण सूक्ष्म स्तरावर विरोधाभास असू शकतो - Operationally) ते देशाचे अहित चींतणार नाहीत याची खात्री विरोधकांनाही आहे. म्हणूनच तर देशात अनेक सरकारे बदलली तरीही संघ टिकून आहे अणि अधिक बलवान होत आहे. हीच गोष्ट पी एफ आय सारख्या संघटनेबद्दल म्हणता येईल का? देशाच्या वाइटावर बसलेले हे अणि त्यांचे परकीय म्होरके हे भारत केंव्हा गिळंकृत करतील कळणार पण नाही अणि आपण राजकारण करत बसू. तुम्ही भाजपचा राजकीय विरोध जरूर करा. परंतु ते देशविघातक आहेत असा समज करून घेऊ नका. आपल्याच लोकांना दूर करण्याची चूक होऊ नये. 

            तिसरी म्हणजे या प्रकरणाने इस्लामबद्दल अणि भारतीय मुसुलमनांबद्दल अजून विद्वेष पसरवला जाऊ शकतो. भारतातील प्रत्येक मुसुलमन हा देशद्रोही आहे किंवा अशा दहशतवाद्यांना समर्थन करतो हा समाज चुकीचा आहे.या देशात मुसलमान व्यापारी म्हणून आले,काही जण आक्रमणकरते म्हणूनही सुद्धा आले, त्यांच्या सोबतचा लावजमा आला. पुढे काही जण इथेच स्थायिक झाले आणि शासक झाले, काहींचे पूर्वज धर्मांतरित होऊन इस्लामी झाले. परंतु सगळे इथे थांबले कारण त्यांना या भुमिबद्दल प्रेम आणि आकर्षण होते.  खरं तर आजच्या पिढीतील बहुसंख्य भारतीय मुसुलमान हे या देशात रहात असल्याबद्दल समाधानी आहेत. काहींमध्ये थोडी चलबिचल आहे विविध कारणांमुळे . अणि नेमक्या याच परिस्थितीचा फायदा पी एफ आय सारख्या संघटना घेतात. देशातील काही घटनांचा संदर्भ देऊन अशा चंचल प्रवृत्तींना आपल्याकडे खेचून त्यांचा दुरुपयोग करून देशात हाहाकार मजवणे हा यांचा हेतू. आणि अत्यंत कर्मठ इस्लामी शासन आणणे हा त्यांचा उद्देश. त्यांना सामान्य मुसुलमनांच्या भावनांशी अणि त्यांच्यावर झालेल्या कथित अन्यायाबद्दल काहीही घेणे देणे नसते. तरी काहींच्या गैरकृत्यमुळे सर्व मुसुलमनांना देशद्रोही किंवा त्यांचे समर्थक समजू नये. आपल्याच लोकांना दूर करण्याची चूक होऊ नये. 

चौथी गोष्ट. आपल्याच धर्माबद्दल असे का होते? बरं इथेच नाही तर अनेक देशांत काही प्रमाणात इस्लाम बद्दल द्वेष आहे. किमान अविश्वास तरी आहेच. असे का? हा विचार मुस्लिम नेत्यांनी आणि जाणकार मंडळींनी जरूर करावा. आपण इथले राज्यकर्ते होतो अणि आता दुय्यम नागरिक बनू या भीतीने पाकिस्तानची निर्मिती झाली. काय अवस्था झाली आहे पहातोच आहे. त्या मानाने इथेच थांबलेले मुसलमान बरेच सुस्थितीत आहेत. त्यामुळे भारतात हिंदू राज्य येईल अणि आपल्यावर अनन्वित अत्याचार होतील या भ्रमात राहू नये. या देशात हिंदूंचे राज्य असताना गेले कित्येक शतके  कोणावरही असे झाले नाही. होणार नाही. अणि देशातले हिंदू तुमचे बांधव आहेत. तुम्हाला कदाचित कळत असेल किंवा नसेलही परंतु पाकिस्तानातील मुसलमानाच्या तुलनेत हे हिंदू तुम्हाला जास्त जवळचे आहेत. आपल्याच लोकांना दूर करण्याची चूक मुसलमानांनी करू नये.

            पी एफ आय , इसिस सारख्या शक्तींना पराजित करायचे असेल तर आपल्याला अविश्वास सोडून सर्वेलांस अणि काउंटर इंटेलिजन्स सारख्या गोष्टींकडे वळायला हवे. धर्माचे राजकरण हे ऐकायला कितीही रमणीय वाटले तरी ते देशाला घटक ठरणार यात शंका नाही. आता, जर कोणाला वाटत असेल की मी उगाच सेक्युलर फंडा मरतोय किंवा सुप्त पणे हिंदू अजेंडा पुढे सरकवत आहे तर हे लक्षात घ्या - योगायोगाने ( अणि खरेच योगायोगाने असेल) ज्या वेळी हे छापे मारले जात होते नेमक्या त्याच वेळी सरसंघचालक हे दिल्लीतील मशिदीचा दौरा करीत होते. आणि मौलवींनी त्यांचे स्वागत केले . त्यांची स्तुतीही केली. एक वेळ आमचे  सोडा- ते दोघे तर निश्चित मूर्ख नसतील ना?


सुशांत गोसावी

23 सप्टेंबर २०२२

Saturday, September 17, 2022

हैप्पी बर्थडे मोदीजी !

भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांना बहात्तराव्या वाढदिवसानिम्मत हार्दिक अभिनंदन आणि दीर्घ आयुष्यासाठी अनेक शुभेच्छा. एका सामान्य कुटुंबात जन्मलेल्या व्यक्तीने भारतासारख्या मोठ्या देशाच्या सर्वोच्च (जनप्रतिनिधित्वाच्या दृष्टीने) पदावर विराजमान होणे ही छोटी गोष्ट नव्हे . ती किमया मोदींनी करून दाखवली आहे. ते फक्त पंतप्रधान झाले नाहीत तर गेले  वर्ष देशाचे सक्षमरित्या नेत्तृत्व करीत आहेत. १३ वर्ष गुजरातचे मुख्यमंत्री आणि पुढे  वर्ष देशाचे नेतृत्व करण्याची मोदींनी जी किमया केली आहे त्याची स्वतंत्र भारतात तरी तोड नाही.स्वकर्तुत्वाने  कोणी व्यक्ती अशा सर्वोच्चपदावर पोहोचण्याचे आणि असे निर्विवाद नेतृत्व स्थापित करण्याचे दुसरे कुठले उदाहरण स्वतंत्र भारतात नाही. त्या अनुषंगाने मोदींना भारताचे सर्वोत्कृष्ट नेते म्हंटले तरी वावगे ठरणार नाही . आता हे म्हंटल्यावर साहजिकच नेहेरु आणि इंदिरा गांधींचा विषय समोर येणारच . परंतु त्या दोघांना राजकीय वारसा प्राप्त होता. अर्थात वारसा असल्यामुळे त्यांचे कर्तृत्व आणि योगदान कमी होत नाही हे हि निश्चित. परंतु कुठलाही वारसा नसतांना,जनसामान्यातून कोणी एक व्यक्ती पुढे येतो आणि देशाचे नेतृत्व करतो या घटनेला विशेष महत्व आहे. भारतात लोकशाहीची पाळेमुळे रुजली आहेत का? या प्रश्नाला हे एक चोख उत्तर म्हणावे लागेल.अर्थात हे घडण्यामागे भाजपासारख्या तथाकथित 'फॅसिस्ट धार्जिण्या' पक्षाची सक्षम अंतर्गत लोकशाही कारणीभूत आहे हे ही विसरता कामा नये.गम्मत बघा - तथाकथित फॅसिस्ट पक्ष एका सामान्य व्यक्तीला पंतप्रधानपदापर्यंत नेऊन ठेवतो आणि दुसरीकडे भारतात लोकशाही प्रस्थापित करणाऱ्या पक्षाचे नेतृत्व गेले २४ वर्षे एकाच व्यक्ती करीत आहे !

असोसगळ्यांप्रमाणे मोदींमध्येही गुणदोष आहेतचआणि वाढदिवस हा ते बाहेर काढण्याचा दिवस नाहीचांगल्या गोष्टींबद्दल बोलायचे तर मला जे अगदी प्रकर्षाने जाणविले त्याबद्दल लिहितो२००५ साली अमेरिकेने मोदींचा व्हिसा रद्द केला.कोणा कोपऱ्यात पडलेल्या कायद्याच्या आधारे हे करण्यात आलेती एक प्रकारे नामुष्कीच म्हणावी लागेलतदनंतर अमेरिकेकडून अधिकृत आणि अनधिकृत रित्या मोदींना बऱ्याच निंदा नालस्तीला सामोरे जावे लागले.  फास्ट फॉरवर्ड - सन २०१३ साली भारत अमेरिकेचे संबंध अगदीच दुरावले होतेखटपट करून मनमोहन सिंग यांनी ज्या आण्विक कराराला रेटून धरले होते त्याचे काही भविष्य उरले नव्हतेभारत COMCASA कराराबद्दल पुढे जाण्यास धजावत नव्हताव्यापारी क्षेत्रतपण क्षमता असूनही फारशी प्रगती होत नव्हतीआणि हे सगळे कमी म्हणून कि काय - देवयानी खोबाग्रडे प्रकरण घडलेदेशात संतापाची लाट उठलीअशा पार्श्वभूवर मोदी भारताचे पंतप्रधान झालेआता मला सांगा - कुठल्याही सामान्य माणसाने काय केले असते ? आधीच ताणलेले संबंध त्यात तुमची झालेली वयक्तिक अवहेलनाअशा परिस्थितीचा फायदा घेऊन खुन्नस द्यायला पूर्ण वाव होताआणि 'देश कि इज्जतनावाखाली ते खपलेही असतेमोदींचे बहुमत आणि प्रसिद्धी पहाता ते निश्चितपणे शक्य होतेअशावेळी या माणसाने काय करावे ? तर स्वतःचा अपमान गिळून भारत-अमेरिकी संबंधांकडे विशेष लक्ष दिले आणि पूर्वपदावर आणलेराजकीय,सामरिक आणि व्यासायिक दृष्ट्या भारताला तेंव्हा अमेरिकेची गरज होती आणि मोदी हे ओळखून होतेतसे पहिले तर पारंपारिकरित्या भाजप आणि डेमोक्रॅटिक पक्षाचे सख्य नाहीकिंबहुना मोदींवर निर्बंध जरी बुश यांच्या कार्यकाळात लादले असतील तरी ओबामांनी ते हटवण्यास विरोधच केला होता .तसे असून सुद्धा मोदींनी ओबामांशी विशेष सलगी साधलीत्यांना प्रजसत्ताकदिनाचे प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रिक केलेमानवाधिकाराबद्दल आणि एकात्मतेबद्दल मारलेल्या टोमण्यांना दुर्लक्षित केले.  थोडक्यात त्यावेळी मोदींनी राष्ट्रहितास सर्वाधिक प्राधान्य दिले.

फास्ट फॉरवर्ड २०२२भारत अमेरिकेचे संबंध अगदीच घट्ट झाले होतेट्रम्प आणि नंतर बिडेन यांच्याशी वयक्तिक संबंध जुळवण्यात मोदी यशस्वी झाले होते . तशात युक्रेन युद्ध पेटले .  युक्रेन युद्धात भारताने पाश्चिमात्य देशांचे समर्थन करावे ,रशियाशी दुरावा साधावा म्हणून अमेरिकेने खूप प्रयत्न केलेअनेक धमक्याही दिल्या गेल्या असतील पडद्याआडपरंतु मोदींनी घंटा भीक घातली नाहीउलट स्वस्तात मिळतंय म्हणून रशियाकडून अधिकाधिक तेल विकत घेऊन पाश्चिमात्य देशांना फाट्यावर बसविलेलक्षात घ्याजवळपास सगळे जग युक्रेन आणि त्यांना समर्थन करण्याऱ्या पाश्चिमात्य देशांच्या बाजूने होतेलडाख मध्ये आपला चीनशी तणाव सुरु आहेत्यात अमेरिकेची बरीच मदत भारताला होते आहेअशा परिस्थिती मोदींनी जर अमेरिकेच्या बाजूने कौल दिला असता तर कोणी काहीच बोलले नसतेपरंतु त्यांनी या सगळ्या संघर्षाचा फोलपणा ओळखून व्यवहारी दृष्टिकोन ठेवलादेशहित सर्वोच्च मानले.

मोदी आपल्या राजकीय विरोधकांना नेस्तनाबूत करतात -पार झोपवून टाकतात असा त्यांच्यावर आरोप होतोतो खराही आहेपरंतु वयक्तिक दुराग्रह आणि अहंकार कुठे मध्ये आणायचा आणि कुठे सोडायचा हे त्यांना चांगलं कळतंयआणि म्हणूनच ते देशाचे सर्वउत्कृष्ट नेते आहेत असे आमचे ठाम मत आहे.

सुशांत गोसावी